शिंदखेडा गटसाधन केंद्राच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे...

शालेय विद्यार्थ्यासाठी शासकीय योजना

विद्यार्थी लाभाच्या योजना :

1) उपस्थिती भत्ता
लाभार्थी- १ली ते ४ थी शिकणाऱ्या
SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील
पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व
शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या
मुली

2) मोफत गणवेश योजना
लाभार्थी-  ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली

3) मोफत लेखन साहित्य
लाभार्थी- ई . १ली ते ४ थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली

4) शालेय पोषण आहार
लाभार्थी- ई . १ली ते ५ वी ई . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला -
मुलींना दररोज

5) राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
लाभार्थी- ई . ६वी ते ८ वी ई . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला- मुलींना दररोज

6) मोफत पाठ्यपुस्तके
लाभार्थी- ई . १ली ते ८ वी ई . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी

7) मोफत गणवेश योजना
लाभार्थी- ई . १ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य
रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित
संवर्गातील फक्त मुले

8) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
लाभार्थी- इ . ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली

9)सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
लाभार्थी- इ . ८वी ते १० वी SC संवर्गातील मुली

10) माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना
गुणवत्ता शिष्यवृत्ती
लाभार्थी- ई. ५वी ते १० वी SC,VJNT.SBC मुले व मुली

11) परीक्षा फी
लाभार्थी- ई. १० वी (एस . एस . सी . बोर्ड ) ई. १० वी SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली

12) अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या
पाल्यांना शिष्यवृत्ती
लाभार्थी- ई. १ली ते १० वी १) जातीचे बंधन नाही २)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या
स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न .
पा . यांचे प्रमाणपत्र ३)खालील व्यवसाय
असावेत . जनावरांची कातडी सोलणे , कातडी
कमावणे ई .

13) अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
लाभार्थी- ई. १ली ते १० वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील
विद्यार्थी विद्यार्थी अ ) अंध ब)मुकबधीर
क)अस्थिव्यंग

14) राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
लाभार्थी- ११वी एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली

15) राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती 
लाभार्थी- १०वी व १२ वी १०वी व १२ वी बोर्डात शाळा /
महाविद्यालयातून सर्वसाधारण
विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC
मुले मुली

16) अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
लाभार्थी- ५ वी ते ७ वी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे
मुले - मुली

17) मोफत गणवेश योजना
लाभार्थी- १ली ते ४ थी मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग
योजने अंतर्गत )

18) PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
लाभार्थी- ई. १ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी
समाजातील विद्यार्थ्यांसाठी १)मागील
वर्षी ५०% गुण आवश्यक २) उत्पन्न १ लाखांपर्यंत
३)साक्षांकीत फोटो ४)१०/- च्या स्टंप पेपर वर
स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र
५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना
अनुद्नेय नाही

19) सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
लाभार्थी- ई . १ ते १०
एकात्मिक आदिवासीविकास
प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली
२)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित
केलेले प्रमाणपत्र ३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८
लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे
प्रमाणपत्र ४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .