शिंदखेडा गटसाधन केंद्राच्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे...

MDM

MDM ची माहिती रोजच्या रोज भरायची आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी...


MDM माहिती ऑनलाइन भरण्यासाठी क्लिक करा


1) MDM ची माहिती भरन्यासाठी आपण जे अँड्रॉइड APP वापरतो ते APP जर जुने असेल तर आपण भरलेल्या माहितीमध्ये समस्या निर्माण होऊ शकते असे लक्षात आलेले आहे.त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये असलेले जुने APP DELETE करावे आणि  सध्या MDM च्या पोर्टल वर उपलब्ध करून दिलेले UPDATED APP इन्स्टॉल करून घ्यावे अशा सूचना सर्वांना या देण्यात आलेल्या आहे याची नोंद घ्यावी.

2) आपण एखाद्या शाळेकडून शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशीच धान्य उसने घेतले असेल तर ते ओपनिंग बॅलन्स मध्ये मायनस म्हणून नोंद करावयाचे आहे.शाळा सुरु झाल्यानंतर जर आपणास माल कमी पडला म्हणून आपण उसना घेतला असेल तर त्या मालाची नोंद ही स्टॉक इनवॉर्ड या फॉर्म मध्ये घ्यायची आहे.त्या फॉर्म मध्ये आपन कोणाकडून तांदूळ उसना घेतला आहे याची देखील नोंद घ्यायची आहे.जेंव्हा आपल्याकडे धान्य पुरवठादारामार्फत पुरवले जाईल तेंव्हा आपण जेवढे धान्य आले त्याप्रमाणेच नोंद स्टॉक इनवॉर्ड या फॉर्म मध्ये घ्यायची आहे.जरी आपण शेजारच्या शाळेकडून तांदूळ उसना घेतला असेल तरी ते धान्य कमी करून मग नोंद घेण्याची आवश्यकता नाही आहे याची नोंद घ्यावी.आणि आपण घेतलेला उसना तांदूळ देखील त्या शाळेला परत करावयाची गरज नाही हे देखील लक्षात घ्यावे.आपण ज्या शाळेकडून धान्य उसने घेतो त्या शाळेचा udise नंबर सिस्टिम मध्ये भरत असतो तेंव्हा ज्या शाळेतून धान्य उसने घेतले जाते त्या शाळेचा स्टॉक देखील सिस्टिम कडून मेन्टेन केला जाणार आहे त्यामुळे आपण त्यांना धान्य परत करण्याची आवश्यकता नाही आहे हे लक्षात घ्यावे.सर्व शाळांना शासनामार्फतच धान्य पुरवले जाते त्यामुळे उसना घेतलेला माल हा परत करण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्यावे.मात्र उसने घेतलेले वा दिलेले साहित्याची नोंद आपल्या रजिस्टर ला माहितीसाठी करून ठेवावी.

3) ज्या शाळेने ओपनिंग बॅलन्स भरला आहे आणि beo लॉगिन मधून देखील finalize झालेले आहे अशा शाळांना जर आपल्या शाळेत वर्ग वाढला असेल तर आपल्या नवीन वाढलेल्या वर्गाची नोंद beo लॉगिन मधून घेता येत नाही आहे.यासाठी beo लॉगिन मधून finalize झालेल्या या नोंदी *शिक्षणाधिकारी* लॉगिन मधून दूरस्थ करून घ्याव्यात आणि वर्ग वाढल्याची नोंद करुन घ्यावी.तशी सुविधा शिक्षणाधिकारी यांच्या mdm लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

4)ज्या शाळांचा ओपनिंग बॅलन्स भरताना चुका झालेल्या आहेत अशा शाळांना दुरुस्थिसाठी लवकरच थोड्या कालावधीसाठी तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,याची नोंद घ्यावी.अशा शाळांनी पुढील सुचनेची वाट पहावी.तसेच ज्यांनी ओपनिंग बॅलन्स अद्यापही भरलेला नाही आहे अशा शाळांना आज अखेरची मुदत दिलेली आहे परंतु ही मुदत 2 दिवस म्हणजेच 27 जुलै पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.यानंतर मुदत वाढवण्यात येणार नाही असे कळवण्यात आलेले आहे.